Skip to content Skip to footer

शिवसेना भाजपा युतीचा पालघर मध्ये दणदणीत विजय

आज लागलेल्या नगर परिषदेच्या निकालात शिवसेना आणि भाजपा युतीचा पालघर मध्ये दणदणीत विजय झालेला आहे. पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे आज निकाल लागले. नगरपरिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा प्रत्येकी एक-एक उमेदवार हा बिनविरोध निवडून आला होता. त्यामुळे २६ जागांवर निवडणूक लढवण्यात आली. त्यानंतर आज लागलेल्या निकालात एकूण २८ जागांपैकी २० जागांवर शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळवला. तर नगराध्यक्ष पदी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला काळे विजयी झाल्या.

शिवसेना १४ जागा तर भाजपने ६ जागा जिंकल्या. म्हणजेच युतीला २८ पैकी २० जागी विजयी मिळाला. तर अपक्ष- ०५, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-बविआ अशा आघाडील ३ जागांवर विजय मिळाला. दरम्यान, पालघर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या तीच्या उमेदवार श्वेता पाटील यांचा निसटता पराभव झाला. काही दिवसापूर्वीच पालघर मध्ये शिवसेना-भाजपा युतीची सभा झालेली होती. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तथा पालघरचे पालक मंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा हजर होते.

आज लागलेल्या पालघर नगर परिषदच्या निकालाकडे येणाऱ्या महाराष्ट्रातील लोकसभेची सेमीफायनल म्हणून पहिले तर वावगे ठरणार नाही. आज शिवसेना आणि भाजपाला पालघर मध्ये मिळालेल्या यशा बद्दल तेथील स्थानीक कार्यकर्ते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज शिवसेनेला पालघरचा गड जिंकता आलेला आहे असे मत आज मांडले जात आहे आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा महाराष्ट्रात युतीचा भगवाच फडणकर असेच आजच्या निकाला नंतर दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5