Skip to content Skip to footer

नवनीत कौर राणा यांचे बनावट जात प्रमाणपत्र रद्द

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणाऱ्या नवनीत कौर-राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिलेला आहे. अमरावती येथील जयंत वंजारी व राजीव मानकर यांनी नवनीत कौर यांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर न्या. बी. आर. गवई व न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी सदर प्रकरणात उपरोक्त निकाल दिला. जी शाळा अस्तित्वातच नाही, ती शाळा सोडल्याचा दाखला कसा दिला जातो आणि या आधारावर तयार झालेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरता येणार नाही, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने आपल्या निकालात केले आहे.

नवनीत कौर राणा ह्या राष्ट्रवादी पक्षातून मागच्या २०१४ च्या निवडणुकीला उतरल्या होत्या त्यावेळी त्यांना राष्ट्र्वादीने पाठिंबा सुद्धा दिलेला होता. परंतु शिवसेना पक्षाचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या लोकहिताच्या कामगिरीमुळे २०१४ च्या निवडणुकीला आनंदराव अडसूळ भारी बहुमताने निवडणून सुद्धा आले होते. या पराजया नंतर त्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमाला दिसलेल्या नव्हत्या आणि त्याची भाजपा पक्षा बरोबर जवळीक सुद्धा वाढलेली दिसून येत होती. परंतु तेव्हा नवनीत कौर यांनी बनावट जात प्रमातपत्राचे प्रकरण चांगलेच गाजेल होते. त्यांचे जात प्रमाणपत्र सुद्धा कोर्टाने रद्द केले होते. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीला अमरावती मतदार संघातून कौर यांना तिकीट भेटू शकते याची शक्यता सध्या तरी कमी दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5