एका खाजगी वृत्त वाहिनीने केलेल्या ‘ऑपरेशन भारतवर्ष’ या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक खासदारांचा भ्रष्ट चेहरा समोर आला असला, तरी काही खासदार असेही आहेत ज्यांनी पैसे घेण्यास किंवा देण्यास स्पष्ट नकार दिलेला होता. यामध्ये महाराष्ट्रातील एका खासदाराचाही समावेश आहे. ऑपरेशन भारतवर्ष मध्ये काही असेही खासदार समोर आले ज्यांनी निवडणुकीसाठी कोणत्याही प्रकारचा काळा पैसा घेण्यास नकार दिला. महाराष्ट्रातील शिर्डी मतदारसंघातून निवडून आलेले खासदार सदाशिव लोखंडे यांचाही या प्रामाणिक खासदारांमध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त आम-आदमी पक्षाचे पतियाळा येथील खासदार डॉ. धर्मवीर गांधी आणि इंडियन नॅशनल लोकदलाचे सिरसा येथील खासदार चरणजीत सिंह रोडी यांचाही या प्रामाणिक खासदारांमध्ये समावेश आहे.
निवडणुकीच्या दरम्यान अनेक खासदार आणि उमेदवार काळा पैसा वापरून निवडणुकीला जिंकून येण्यासाठी जीवाचे रान करतात परंतु सत्तेत येण्यासाठी हवा तेवढा पैसा खर्च करतात. पण त्यात काही पुढारी फक्त जनतेची सेवा कारण्यासाठी फक्त राजकारणात येतात आणि पुन्हा एकदा खासदार लोखडे यांच्या प्रामाणिकपणा मुळे हे सिद्ध झालेले आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्टिंगमध्ये पक्षासाठी ७ कोटी रुपये खर्च केल्याचा खुलासा केला. तसेच चर्चेदरम्यान रुग्णालयाचा उल्लेख करत रुग्णालयासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. आज माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली शिकवण पुन्हा खासदार लोखंडे यांच्या वागण्यातून दिसून आलेली आहे.