लोकसभा निवडणुकीला आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज दोन वेगळ्या ठिकाणी सभा घेणार आहे. त्यामुळे राजकीय दृष्टीने कोल्हापुरातील वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येणार नाही. उद्धव ठाकरे यांची सभा इस्मालपूर मतदार संघातील उमेदवार ध्येयाशिल माने यांच्या प्रचारासाठी सायंकाळी आयोजित करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे हे सकाळी कोल्हापुरात आगमन करतील पुढे सायंकाळी ते इस्लामपूर येथे सभेला जातील.
तर शरद पवार यांची सभा कागल तालुक्यात होणार असून राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहे. धनंजय महाडिक यांच्या विरोधात शिवसेना पक्षाचे प्रा. संजय मंडलिक हे उमेदवार म्हणून उभे आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी सकाळ पासून कोल्हापुरात तळ ठोकून बसल्यामुळे विरोधकांना सुद्धा धडकीच भरलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात कोल्हापुरातील जागेवर सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जाहीर पाठिंबा शिवसेना उमेदवार मंडलिकांना दिल्यामुळे तसेच शिवसेनेच्या पाचही आमदारानंमुळे सहजच ही कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाटेला येणार असेच बोलले जात आहे.
शेतकर्त्यांचा नेता म्हणून सहानुभूती मिळवलेल्या खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात सध्या कोल्हापुरातील वातावरण तापत असताना दिसत आहे. आज ज्या कारखानदारांना शेट्टी यांनी विरोध केला आज त्याच्याच बरोबर महाआघाडीत सामील होऊन शेतकर्यांचा विश्वासघात शेट्टी यांनी केला आहे. त्यातच ब्राह्मण समाजावर केलेल्या वक्तव्यामुळे सुद्धा ब्राम्हण समाजाने शेट्टी यांना मतदार न करण्याचे ठरविले आहे. ह्या घडणाऱ्या घडामोडी मध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणे म्हणजे तेथे शिवसेनेचा विजय पक्का आहे असच मानले जात आहे.