राणे यांचे कट्टर कार्यकर्ते करणार शिवसेना पक्षाचा प्रचार

लोकसभा | Rane-Ke-Kartar-Karkare

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे आमदार कालिदास कोळंबकर हे लोकसभेच्या निवडणुकीला शिवसेना पक्षाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार करणार आहे. आमदार कालिदास कोळंबकर हे वडाळा-नायगाव मतदार संघाचे आमदार आहे. मागील सहा वेळा ते या विभागातून सलग आमदार म्हणून निवडणून येत आहे त्याचमुळे त्या विभागात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग निर्माण झालेला आहे. राणे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यावर कोळंबकर यांनी सुद्धा शिवसेना पक्षाला सोडचिट्टी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

आज कोळंबकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातून भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. मागील काही महिण्यापासून कोळंबकर आणि फडणवीस यांच्यातील मैत्रीची चर्चा सर्वत्र रंगत असताना दिसत होती. कोळंबकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील त्याचे मी पालन करीन. कारण आमच्या पोलीस वसाहतीचा प्रश्न हा मुख्यमंत्र्यांनी सोडवला आहे. त्यामुळे त्यांनी जर आदेश दिले तर मी युतीच्या उमेदवाराचा प्रचार नक्की करेन. तसेच माझा फायदा युतीच्या उमेदवाराला होईल. असे सुद्धा मत वर यांनी मांडले होते. कोळंबकर यांनी अनेक वर्षा पासून विभागातील मोडकळीस आलेल्या चाळीचा प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न केले आहे.

वडाळा आणि नायगाव हा भाग दक्षिण मध्य मुंबईत येत असल्याने या विभागात शिवसेना तर्फे शेवाळे आणि काँग्रेस तर्फे गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. परंतु या भागातील चाळीचा प्रश्न सोडवण्यासाठी शेवाळे यांचा सुद्धा खारीचा वाटा आहे. त्यामुळेच शेवाळे यांचा विजय पक्का मानला जात आहे परंतु कोळंबकर यांच्या भागातील मत ही निर्णयात्मक मानली जातात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here