Skip to content Skip to footer

ज्याने कधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही तो आता खासदारकीचे स्वप्न पाहत आहे गिरीश बापट

राजकारण हा धंदा नाही किंवा घराणेशाही नाही तसेच नातेवाईकांची व्यवस्था करण्याचे ठिकाण नाही. ते त्यागावर आणि समाजकार्यावर उभं असत. ज्याने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही तो खासदारकीची निवडणूक लढवत आहे असे म्हणत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पार्थ पवार यांच्यावर तोफ डागली आहे. शिवसेना, भाजप,  आरपीआय महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरीत ते बोलत होते. यावेळी भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून तर ती पवार कंपनीने चालवलेली कंपनी आहे अशी टीका देखील बापट यांनी केली.

राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस संपत चालली आहे. जो आजोबांच्या आणि वडिलांच्या पुण्याईवर निवडणूक लढवत आहे त्याला समाज मान्य करणार नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी लादली असून जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे असंही बापट म्हणाले. मावळ मतदार संघात शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात पार्थ अजित पवार यांना राष्ट्र्वादीने मैदानात उतरविले आहे. परंतु खासदार बारणे यांच्या कामाचा आलेख पाहता त्यांना संसदरत्न पुरस्कारने सुद्धा सम्मानित करण्यात आलेले आहे. अशा लोकहिताची कामे करणाऱ्या बारणे समोर नवखा उमेदवार काय टिकणार अशी टीका सुद्धा केली जात आहे.

आज गिरीश बापट यांनी लावलेले पवार कुटुंबा वरील आरोप एक प्रकारे सिद्ध होताना दिसत आहे. आज पवार कुटुंबात खासदार ते जिल्हा परिषदेचे सदस्य पद पवार कुटूंबातील व्यक्तीकडे असतानाच दिसून येत आहे. मग कार्यकर्त्यांनी नुसत्या सतरंज्या उचलायच्या काय? असाच सवाल आज राष्ट्रवादीला विरोधक विचारत आहे. आज बारामती आणि मावळ मतदार संघ जिकण्यासाठी पवार कुटुंब राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांन कडे दुर्लक्ष करताना दिसत आहे आणि याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी पक्षाला बसण्याचे सुद्धा नाकारता येणार नाही.

Leave a comment

0.0/5