Skip to content Skip to footer

पवारांच्या सभेनंतर कार्यकर्ते गळा सुका करण्यासाठी ढाब्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ठिकठिकाणी जात आहेत. बीडमध्ये त्यांना ऐकण्यासाठी मोठी गर्दी उसळली. मात्र, भर उन्हात सभा संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी चक्क ढाबे गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्यकर्त्यांनी चक्क पाण्याची तहान दारुवर भागवल्याचे पाहायला मिळाले. आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आष्टी येथे शरद पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आज ‘ड्राय डे’ असल्याने जिल्ह्यातील सर्वच दारु दुकाने आणि बिअर बार बंद होते. मात्र, बीडमध्ये विविध ढाब्यांवर सर्रास दारू विक्री होताना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खुलेआम उघड्यावर बसून दारू पिताना दिसून आले.

डॉ. आंबडेकर जयंती असल्यामुळे संपूर्ण राज्यात ड्राय-डे घोषित करण्यात आलेला होता. त्यामुळे सर्वत्र दारू बंदी करण्यात आलेली होते. परंतु अवैद्यरित्या दारू उपलब्ध करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपला गळा सुका केला होता. आज राष्ट्रवाद शिकवणारे शरद पवार या विषयवार काय बोलणारा हेच समजले नसले तरी पवारांच्या सभेला येणारी गर्दी फक्त दारू आणि मटणासाठी जमा होते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Leave a comment

0.0/5