Skip to content Skip to footer

अमोल कोल्हेची क्रेझ कमी ??

शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्र्वादीने शिवसेना पक्षातून बंडखोरी करून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन शिवसेना खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे शिरूर मतदार संघातील ही निवडणूक अधिकच चुरशीची बनत चाललेली दिसून येत आहे. परंतु कोल्हे यांना उमेदवारी देऊन तेथील स्थानिक उमेदवार आमदार विलास लांडे यांच्यावर अन्याय केल्याचे सुद्धा बोलले जात आहे. तसेच भर सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या समोर लांडे समर्थकांनी आपला राग सुद्धा व्यक्त केलेला दिसून येत होता

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जीवाचे रान करून अमोल कोल्हे यांचा प्रचार करताना दिसत असले तरी उमेदवारच चक्क येन निवडणुकीच्या काळात आपल्या शुटींगच्या कामात मुंबईत व्यस्त असताना दिसून येत होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांनाची उत्तरे सुद्धा देताना पंचायत होत होती. कधी घोडयावरून प्रचार तर कधी मालिकेतील संभाषणा प्रमाणे भाषण करणे या प्रकारामुळे अमोल कोल्हे आपल्याच मतदार संघात टीकेचे धनी बनत आहे. आज बैलगाडा शर्यत, एअरपोर्टचा विषय काढून जनतेची सहानुभूती मिळवणाऱ्या कोल्हे यांचा हा प्रयत्न फिस्कटलेला दिसून येत होता.

आज डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराला दिसत असलेली गर्दी आणि त्यांच्या प्रचाराला जमत असलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची फौज या वरून स्पष्ठ दिसून येते की, अमोल कोल्हे यांना शिरूर मतदार संघातील जनतेने आणि खुद्द राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीच नाकारलेले आहे. आज राजकारण आणि मालिकेतील अभिनय यात फरक असतो हे आज कुठेतरी कोल्हे यांना समजलेले दिसून येत आहे. आज लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यावरून अमोल कोल्हे यांना आपला पराभव दिसून येत आहे. या उलट मागील पंधरा वर्ष खासदार राहिलेल्या खा. पाटील यांनी बैलगाडा शर्यत, पुणे- नाशिक लोहमार्ग आणि चाकण विमानतळ हे प्रश्न संसदेत उपिस्थत करून लोकहिताची अनेक कामे केलेली जनतेला सुद्धा दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5