Skip to content Skip to footer

आम्हाला गुंड नको खासदार हवा उद्धव ठाकरेंचा नारायण राणे यांना टोला

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना दिसतात. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. या आधी इथे गुंड होते, विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढलीत. आम्हाला गुंड नकोत खासदार हवे आहेत असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना टोला लगावला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची कोकणात शिवसेना उमेदवार खासदार विनय राऊत यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती.

खासदारांचे शिक्षण काढता. शिक्षण काय संतानी घेतले होते का ? बहिणाबाई न शिकता त्यांनी मोठी उंची गाठली. विनायक राऊत यांनी कधीही हातातला झेंडा बदलला नाही. निष्ठा हवी असते. समोरच्या उमेदवाराकडून तुम्ही काय निष्ठेची अपेक्षा ठेवता अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर केली. या मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे निवडणूक लढवत आहेत. परंतु राणे हे भाजपा कोट्यातून खासदार झाल्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी असे सुद्धा सांगण्यात येत होते.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, मी महाराष्ट्रभर फिरतोय. नेते मंडळींनी भाषणात आपण काय करतोय हे मतदारांना सांगितले पाहिजे. एका कुटुंबात वेगवेगळे झेंडे लोक घेत आहेत. तसे इथे होऊन चालायचे नाही. काही लोकांच्या सभेला गर्दी असते. आमच्या सभेला जी गर्दी असते ती मनाने आलेली लोक असतात असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. आज राणे कुटूंबात नारायण राणे भाजपा खासदार, एक मुलगा काँग्रेस आमदार आणि एक मुलगा स्वाभिमानी पक्षातून उभा राहिल्यामुळे राणे परिवाराने इतरांना निष्ठा शिकवू नये असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टोला राणे परिवाराला लगावला आहे.

Leave a comment

0.0/5