Skip to content Skip to footer

पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारांना घेरण्याचा भाजपचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून बारामती मतदार संघाकडे पहिले जात आहे. २०१४ च्या निवडणुकीला याच मतदार संघातून शरद पवारांची मुलगी सुप्रियाताई सुळे या निवडून आल्या होत्या. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीला बारामती हा गड जिंकणे राष्ट्रवादी पक्षाला कठीण जाणार आहे. बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे यांना भाजपा पक्षा कडून कांचन राहुल कुल यांचे तगडे आव्हान असणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे नाही तर देशाचे लक्ष बारामती मतदार संघाकडे लागलेले आहे असेच चित्र दिसून येत आहे.

बारामती मतदार संघात भाजपने यंदा कधी नव्हे इतका जोर या मतदार संघात लावल्याने साऱ्या देशाचे लक्ष याच मतदार संघाकडे लागलेले आहे. सुप्रिया सुळे यांना निवडणुकीला आव्हान कांचन कुल यांचे असेल तरी खरी लढत पवार विरुद्ध भाजपा पक्ष अशीच होताना दिसून येणार आहे. या मतदार संघात महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील तळ ठोकून बसलेले आहे. तसेच भाजपच्या डिग्गज नेत्यांची सभा सुद्धा बारामती मतदार संघात पार पडणार असल्याचे बोलेल जात आहे. अमित शहा, नितीन गडकरी, स्मुर्ती इराणी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्यांची फौजच बारामती मतदार संघात भाजपाने प्रचारासाठी उतरवली आहे.

यातच मंत्री पाटील हे बारामती मतदार संघात तळ ठोकून बसलेले आहे आणि “कोणत्याही परिस्थितीत बारामती भाजपाकडे खेचून आणा” असा आदेशच पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. केवळ राष्ट्रीय नेते नाही तर महाराष्ट्रातील डिग्गज नेते मंडळी सुद्धा बारामती मतदार संघात प्रचारासाठी उतरली आहे. मंत्री विजयबापू शिवतारे, महादेराव जाणकर, पंकजा मुंडे, गिरीश महाजन अशी महाराष्ट्रातील नेत्यांची फौज सुद्धा कांचन कुल यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरलेली आहे. त्यामुळे येणारी निवडणून जिंकणे राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना जड जाणार असेच बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5