Skip to content Skip to footer

१७ लक्ष उत्तर हिंदुस्थानीचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा…….

मुंबईतल्या उत्तर हिंदुस्थानींनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचे पारडे जड झाले आहे. मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांत सुमारे १७ लाख उत्तर हिंदुस्थानी मतदार आहेत. मुंबईतल्या उत्तर हिंदुस्थानींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मतदान केले होते. या निवडणुकीतही उत्तर हिंदुस्थानी समाज महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे.त्यामुळे महायुतीचे सहाच्या-सहा उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार हे आता पक्के झाले आहे.

निवडणूक आयोगाकडील माहितीनुसार मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांतील एकूण मतदारांची संख्या सुमारे ९४ लाख ५८ हजार ३९७ आहे. त्यापैकी उत्तर हिंदुस्थानी मतदारांची संख्या सुमारे १७ लाख आहे. त्यामुळे या समाजाचा मोठा प्रभाव मतदानावर पडतो. पूर्वी मुंबईतल्या उत्तर हिंदुस्थानी समाजातील मतदार काँग्रेसचे पारंपरिक मतदार म्हणून ओळखले जात होते. पण नंतर हा समाज महायुतीकडे आकृष्ट झाला. त्याचा प्रत्यय २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आला. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली आदी राज्यांमधील उत्तर हिंदुस्थानी समाज नोकरी-व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत स्थायिक झाला आहे. विकास, मुंबईतील सुरक्षित वातावरण आणि हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर हा समाज महायुतीकडे खास करून शिवसेनेकडे वळलेला दिसत आहे.
मुंबईतील उत्तर भारतातील मतदारांची संख्या

दक्षिण मुंबई – १ लाख ९५ हजार ते २ लाख १० हजार
दक्षिण-मध्य मुंबई- १ लाख ५० हजार ते १ लाख ६५ हजार
उत्तर-पूर्व मुंबई – २ लाख ५० हजार ते २ लाख ७५ हजार
उत्तर-मध्य मुंबई- २ लाख ७३ हजार ते २ लाख ८५ हजार
उत्तर पश्चिम मुंबई- ४ लाख ५० लाख ते ४ लाख ७५ हजार
उत्तर मुंबई – २ लाख ५० हजार ते २ लाख ७५ हजार

Leave a comment

0.0/5