काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकतत्व घेतलेले आहे. याच कारणामुळे त्यांची उम्मेदवारी रद्द करण्यात यावी. अशी तक्रार अमेठी लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी रिटर्निंग अधिकाऱ्याकडे केली आहे. ब्रिटनमधील रजिस्ट्रेशन असलेल्या एका कंपनीच्या कागदपत्राद्वारे रवी प्रकाश यांनी हा दावा केला आहे. या मुद्धवेर भाजपाने काँग्रेस पक्षाकडे स्पष्ठीकारण मागितले आहे. प्रकरणी आपल्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने आपल्याला अवधी द्यावा असे राहुल गांधी यांचे वकील राहुल कौशिक यांनी रिटर्निंग अधिकाऱ्याला सांगितल्याचे भाजपचे नेते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राहुल गांधी यांना सोमवार सकाळपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे, असे सांगत, राहुल यांच्या नागरिकत्वासंदर्भात नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांना उत्तरे दिली गेली नाहीत हे आश्चर्यकारक असल्याचे राव यांनी म्हटले आहे. या प्रकरणी राहुल यांना उत्तर द्यावे लागेल. राहुल हे भारताचे नागरिक आहेत की नाहीत याबाबत निर्माण झालेला मुद्दा हा आश्चर्यचकित करणार आहे, असे राव म्हणाले. राहुल हे ब्रिटिश नागरिक होते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आपण बॅकऑफ्स लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केल्याची माहिती राहुल गांधींनी २००४ च्या निवडणूक शपथपत्रात दिली आहे. या कंपनीच्या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी हे ब्रिटनचे नागरिक असल्याचा उल्लेख आहे, असेही राव म्हणाले