Skip to content Skip to footer

औरंगाबाद येथील झाकीर हुसेन शाळेत बोगस मतदान करताना एमआयएम कार्यकर्त्यांना पकडले

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या निवडणुकीला सकाळी ७.०० वाजल्या पासून सुरवात झालेली आहे. सर्वत्र शांततेत मतदान होत असताना झाकिर हुसेन शाळा औरंगाबाद येथे एमआयएम च्या कार्यकर्त्याना बोगस मतदान करताना पोलीस यंत्रणेने बोगस मतदारांना पकडले आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर एकच खळबळ माजली होती त्यापैकी १० बोगस मतदारांना पलायन करण्यात यश आलेले आहे. पकडलेल्या बोगस मतदारांकडे चौकशी केली तर ते एमआयएमचे कार्यकर्ते असल्याचे उघड झाले होते व पळालेल्या बॅग्स मतदारांचा शोध सध्या घेतला जात आहे.

वंचित बहुजन आघाडी कडून एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे तर त्यांना शिवसेनेचे खासदार चन्द्रकात खैरे यांचे आव्हान आहे. परंतु खासदार खैरे यांचा दांडग्या लोकहिताच्या कामामुळे पुन्हा एकदा खैरे यांनाच निवडणून देणार अशीच हाक औरंगाबाद येथील सर्वच जनतेने दिलेली आहे. त्यामुळे आपला पराभव वंचितचे इम्तियाज जलील यांना दिसू लागल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार करण्यासारखी पद्धत अवलंबलेली दिसून येत आहे. परंतु तेथे उपस्थित असलेल्या पोलिस खात्याच्या बारकाईमुळे या संशयित बोगस मतदारांना पकडण्यात यश आलेले आहे आणि इतर मतदार विभागात सुद्धा बंदोबस्त वाढवण्याचे आदेश जिल्हाधीकारी यांनी दिलेले आहे.

Leave a comment

0.0/5