Skip to content Skip to footer

मोदींचे हात बळकट करण्यासाठी बारणेंना निवडून दया – आदित्य ठाकरे

मावळ मतदार संघाचे शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उरण महानगर पालिकेच्या मैदानांत सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेला संबोधीत करताना आदित्य ठाकरे यांनी आघाडीच्या उमेदवारांचे चांगलेच वाभाडे काढले. १५ वर्षे सत्तेत असताना त्यांनी कोणतीही विकास कामे केली नाही ते आत्ता काय विकास करणार असा सवाल विचारून आपल्या भागाचा विकास करण्यासाठी श्रीरंग बारणेंनाच विजयी करा असे अवाहन त्यांनी जनतेला केले होते.

नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी श्रीरंग बारणे या अभ्यासू खासदारालाच पुन्हा संसदेत पाठविणे गरजेचे आहे. 15 वर्षे सत्तेत असताना त्यांनी निव्वळ भ्रष्टाचार केला आणि जिल्ह्यात जिल्ह्यात भांडणे लावण्याची कामे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘भ्रष्टवादी काँग्रेस’ असा उल्लेख करताना त्यांनी पवार परिवाराच्या घराणेशाहीवर टीका केली. तर शिवसेना आणि भाजपा हा परिवार असून आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले. यावेळी शिवसेनचे जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवि भोईर यांची भाषणे झाली.

Leave a comment

0.0/5