Skip to content Skip to footer

एमआयएमच्या दोन नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून वृद्धाने मागितले इच्छा मरण

स्वतःच्या मालकीच्या इमारतीवर चौथ्या मजल्याचे बेकायदा बांधकाम केले जात होते. सदर प्रकरणी विरोध केल्यानंतर धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसांनी हे बांधकाम करणारा सहद उल्लाह आणि त्यास मदत करणारे एमआयएमचे माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी आणि अजीम खान यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा मला इच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ७० वर्षीय वृद्धाने आयुक्तांकडे केली आहे.

वृद्धाने पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, पैठण गेट येथील इमारतीत माझ्यासह सहा भावांची हिस्सेदारी आहे. त्याचे समान वाटणीपत्रही झालेले आहे. मात्र, आता माझ्या मोठ्या भावाचा मुलगा सहद उल्लाह टेरेसवर अनधिकृतपणे बाराशे चौरस फुटांचे बेकायदा बांधकाम करत आहे. तक्रारीनंतर मनपा अधिकारी हे बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी आले तेव्हा एमआयएमचे माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी आणि अजिम खान हे कार्यकर्त्यांसह तिथे आले. मला धाकी देण्याचा प्रयत्न केला होता.

या इमारतीची क्षमता पाहता चौथा मजला बांधला गेला तर संपूर्ण इमारतीस धोका आहे. तसेच आमच्या जीविताससुद्धा धोका आहे. मी मागील तीन महिन्यांपासून मानसिक दडपणाखाली जगत आहे. म्हणून आता पोलिस आयुक्तांनी मला न्याय दावा किंवा इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

Leave a comment

0.0/5