Skip to content Skip to footer

अरे नालायका कोणाला मत देऊ ? उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांना रोखण्यासाठी भाजपाला मत देऊ नका, असा प्रचार केला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. जे तुम्हाला सांगत आहेत ना तुम्ही याला मत देऊ नका त्यांना देऊ नका, त्यांना विचारा अरे नालायका मग मी कोणाला मत देऊ, असे सांगत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी भाषणात राज ठाकरेंचा उल्लेख करणे टाळले असले तरी या विधानाद्वारे त्यांनी राज यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

सध्या राज ठाकरे महाराष्ट्रात जागो-जागी सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करताना दिसत आहे. आज राज ठाकरे मांडत असलेल्या भूमिकेचा कुठेतरी भाजपा पक्षाला फटका बसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला फायदा पोहचवण्याचे काम करताना दिसत आहे. आज राज ठाकरे स्वतः लोकसभा निवडणुकीला न उतरता महायुतीला फटका बसेल अशीच भूमिका आपल्या सभेतून मांडताना दिसत आहे. या दुपट्टी भूमिकेचा सुद्धा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतलेला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, जे तुम्हाला सांगत आहेत ना तुम्ही याला मत देऊ नका त्यांना देऊ नका, त्यांना विचारा अरे नालायका मग मी कोणाला मत देऊ. युतीला संपवण्यासाठी काँग्रेस निवडणूक लढवत आहे. औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकले होते तो ओवैसी तुम्हाला चालणार आहेत का ? ओवैसीचा पक्ष हा निजामाला पाठिंबा देण्यासाठी उदयास आला. एक औरंगजेब आम्हालासुद्धा जवळचा वाटतो. पण तो औरंगजेब नावाचा एक सैनिक परत होता. तो मुसलमान होता पण देशासाठी लढत होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली. जो या देशाला आपला देश मानतो तो धर्माने कोणताही असो तो आमचा आहे, असे उद्धव ठाकरेंनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5