Skip to content Skip to footer

आगरी मतांसाठी बाबाजी पाटील यांचे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर खोटे आरोप

लोकसभा निवडणूक जवळ आली असतानाच कल्याण लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी आगरी मतांसाठी ‘खोटे बोल पण रेटून बोल’ हे धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असून मतांसाठी वाट्टेल ते सुरू झाल्याने कार्यकर्तेही हवालदिल झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे डॉ. श्रीकांत शिंदे व आघाडीचे बाबाजी पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे. परंतु शिंदे यांना मिळत असलेल्या पठीब्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

महायुतीला मिळत असलेला भरघोस पाठिंबा बघून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता जातीपातीच्या मतांचे राजकारण करण्यास सुरुवात झाली आहे. बाबाजी पाटील यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन ‘डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपणास आगरी समाजाच्या मतांची गरज नाही असे म्हटल्याचे एका पत्रकाराने सांगितले’ असे म्हटले, मात्र प्रत्यक्षात त्या पत्रकाराने त्याचा सपशेल इन्कार केला. हे प्रकरण आपल्या अंगलट येत असल्याचे दिसताच बाबाजी पाटील यांनी सारवासारव केली. शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला. ते म्हणाले की, समाजात तेढ निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव असून याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून पाटील यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावादेखील दाखल करणार असल्याचे डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कडून सांगण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5