Skip to content Skip to footer

विलास लांडे या बुवा माणसाला राष्ट्रवादी कॉंग्रेसवाल्यांनी फसवल – गिरीश बापट

शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार शिवाजी आढ़ळराव पाटील यांच्या प्रचारासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे उमेदवार गिरीश बापट यांचे जोरदार भाषण शिरूर मध्ये झाले होते. या सभेला उद्देशून बोलताना भाजपा तर्फे पुणे मतदार संघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर जोरदार टीका केली होती. पुण्यात कॉंग्रेसला शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार मिळत नव्हता पण शेवटी मलाच लक्ष घालावं लागलं असा दावा पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी केला आहे.

यावेळी गिरीश बापट यांनी कॉंग्रेसकडून पुण्याच्या उमेदवारी बाबत झालेल्या दिरंगाईवर भाष्य केले. ते म्हणाले की, शेवटचा दिवस उजाडला तरी पुणे मतदासंघासाठी कॉंग्रेसला उमेदवार मिळत नव्हता, शेवटी मलाच लक्ष घालावं लागलं असा दावा बापट यांनी केला. ते पुढे म्हणाले की, शिरूर मतदारसंघात आमचे मित्र विलास लांडे या बुवा माणसाला राष्ट्रवादी कॉंग्रेसवाल्यांनी फसवल आहे. तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांना निवडणुका लागल्या की, आजारपण येतं असा टोला बापट यांनी लगावला आहे. दरम्यान यंदा शिरूर लोकसभा मतदार संघात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. भाजप-सेना युतीकडून विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कडून अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5