निवडणूक सर्व्हेक्षक चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा संपूर्ण लेखाजोखा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे ९० हजार ते एक लाख मतांनी निवडून येतील, असा दावा केला गेला आहे.
शिरूरमध्ये शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पहिल्यांदाच अमोल कोल्हे यांच्यारूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे आव्हान मिळाले. त्यामुळे कोणीही जिंकून येऊ शकेल, असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. मात्र आता शिवाजीराव आढळराव पाटील हे ९० हजार ते एक लाख मतांनी निवडून येतील असा दावा किशोर यांनी सोपवलेल्या अहवालात केला आहे. प्रशांत किशोर यांच्या टीमने तब्बल एक लाख लोकांचा सर्व्हे केला आणि त्यातून हा निष्कर्ष आल्याचा दावा केला आहे.
तर दुसरीकडे अमोल कोल्हे यांच्याकडूनही विजयाचा दावा केला जात आहे. आता २३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालानंतर कोणाचा दावा खरा ठरणार हे स्पष्ट होणार आहे.
1 Comment
जाधव जी. के .
सत्य आहे व ते तेवीस मेला कळेल