Skip to content Skip to footer

सेल्फी काढणारा म्हणाला ‘आएगा तो मोदीही’ स्वरा भडकली……

स्वरा भास्करसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरूणाचा व्हीडियो सध्या जाम व्हायरल झालाय. यामध्ये या तरूणाने फोटो काढण्याच्या बहाण्याने छोटा व्हीडियो रेकॉर्ड केला ज्यात तो स्वरा भास्करच्या शेजारी उभं राहून म्हणाला की ‘आएगा तो मोदीही’. व्हीडिओ काढत असताना स्वरा भास्करला काही सुचलं नाही. जेव्हा हा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला तेव्हा तिने ही भाजपची घाणेरडी खेळी असल्याचं सांगून भाजप नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर आगपाखड केली.

हा व्हीडियो व्हायरल झाल्याने स्वरा भास्कर संतापली आहे. व्हीडियो पाहणाऱ्यांनी स्वरा भास्करला चांगला धडा शिकवला असा प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्वराने या व्हीडियोवर प्रतिक्रिया देण्यासाठी एक ट्विट केलं आहे. ज्यात तिने म्हटलंय की एअरपोर्टवर माझ्यासोबत एकाने सेल्फी काढण्याची विनंती केली, मी ही विनंती करणाऱ्या माणसांमध्ये राजकारणाच्या आधारे कधीच भेदभाव करीत नाही. या माणसाने धूर्तपणे हा व्हिडीओ काढला असल्या गोष्टी या भक्तांचे ट्रेडमार्क आहेत.

Leave a comment

0.0/5