Skip to content Skip to footer

शरद पवारांचे निकटवर्तीय सुधीर भोंगळे यांनी केला मोठा खुलासा…..

सरकारी खात्यातल्या लाचखोरीचा अनुभव दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाबतीत घडल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांचे निकटवर्तीय आणि पक्षाच्या मुखपत्राचे प्रमुख सुधीर भोंगळे यांनी हे वक्तव्य केले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलेल्या पवार साहेबांच्या बाबतचा एक गौप्यस्फोट चक्रावून सोडणारा आहे. हा गौप्यस्फोट त्यांचे निकटवर्तीय सुधीर भोंगळे यांनी केला आहे. मराठवाड्यात त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बातम्या सांगत आहेत की, महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला ठिबकचं अनुदान मिळवायला म्हणे लाच द्यावी लागली. हे कर्म आपण स्वतःच केले असेही दस्तुरखुद्द भोंगळे यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे.

सुधीर भोंगळे यांच्या विषयी सांगायचे झाले तर ते जल तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. याचमुळे त्यांचे आणि पवारांचे जवळचे संबंध प्रस्थापित झाले होते. परंतु त्याच्या तिखट बोलण्यामुळे त्यांनी अनेकवेळा शरद पवारांना आणि राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणले होते. साखर न खाल्ल्याने कुणी मरत नाही अशी मल्लिनाथी राष्ट्रवादीतून भोंगळे यांनी केली. तेव्हा, खुद्द शरद पवार यांच्याकडून भोंगळे यांना जाहीर समज देण्यात आली होती. तसेच राहुल गांधी यांचा पाणउतारा सुद्धा यांनीच केला होता तेव्हा प्रफुल पटेल यांनी सारवासावर केली होती.

सुधीर भोंगळे यांनी आता जाणत्या राजाबद्दल केलेले वक्तव्य लक्षवेधी ठरले असले तरी त्यातून गुन्ह्याची कबुलीच दिलीय. कारण, भारतात लाच देणे – घेणे गुन्हा आहे. बाकी, जाणत्या राजाला अनुदान मिळवून द्यायला लाच दिली आणि घेतली गेली, हे ही कायदा राबवताना विसरून कसं चालेल? दरम्यान, सुधीर भोंगळे यांनी आपल्याकडून अनावधानाने तसे वक्तव्य झाल्याचे म्हणत या प्रकरणावर पडदा टाकायचा प्रयत्न सुरू केला. पण, झाल्या प्रकारामुळे भ्रष्टाचार व्यवस्थेत कधीपासून आणि कुठवर रुजलाय हे उघड झाले, हे मात्र नक्की.

Leave a comment

0.0/5