Skip to content Skip to footer

मी दोन वेळा राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरोधात जिंकलो पवार हे विसरले – चंद्रकांतदादा पाटील

महाराष्ट्रातले लोकसभा निवडणुकांचे मतदान संपले आहे. आता सर्वांना वेध लागले आहेत ते निकालाचे. निवडणुकीच्या काळात शरद पवार हे मागच्या दाराने येणाऱ्यांनी एकदातरी लोकांतून निवडून यावे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत होते, त्याला आता पाटील यांनी उत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ‘मी शरद पवारांच्याच उमेदवाराला दोन वेळा हरवून पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो आहे हे पवार विसरतात. पदवीधर निवडणूक ही देखील निवडणूक असते. यासाठी ५ जिल्हे, ५८ विधानसभा आणि १० लोकसभेचे कार्यक्षेत्र असते, हे शरद पवार विसरले आहेत काय असं पाटील म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पक्षाने आदेश दिल्यास आपण विधानसभाच काय लोकसभा देखील लढवू असं विधान केल आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीसह सर्व १० जागा आम्ही जिंकणार असा विश्वासदेखील पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Leave a comment

0.0/5