Skip to content Skip to footer

ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी केली ईव्हीएम प्रणालीची प्रशंसा…….

ऑस्ट्रेलियाच्या हिंदुस्थानातील राजनैतिक अधिकारी हरिंदर सिद्धू यांनी हिंदुस्थानच्या निवडणूक आयोगाची व ईव्हीएमच्या प्रणालीची प्रशंसा केली आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी हिंदुस्थानातील निवडणूक प्रक्रिया ही प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.

हिंदुस्थानातील निवडणूकीचा अनुभव हा फार प्रेरणादायी होता. निवडणूक आयोगाने व अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे सर्व व्यवस्थित हाताळले आहे त्यामुळे भरपूर लोकं मतदानासाठी बाहेर पडली आहेत. ही एक चांगली व सुव्यवस्थित सेवा आहे. इव्हीएममशीन बघून मी खूप प्रभावित झाले आहे. इव्हीएमला जोडलेली व्हीव्हीपॅट प्रणाली देखील खूप चांगली आहे. आमच्या ऑस्ट्रेलियात या मशीन नाहीत. बॅलोट पेपर प्रणाली जी आम्ही ऑस्ट्रेलियात वापरतो ती याच्यासारखी सुव्यवस्थित नाही. त्यामुळे त्याच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकतात’, असे सिद्धू यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5