Skip to content Skip to footer

आपलं गाव, आपली शिवसेनेची शाखा हेच आपलं कुटुंब – अंबादास दानवे

शिवसैनिक सदस्य नोंदणी मोहीम व माझं कुटुंब माझी जबाबदारी या दोन्ही मोहीम संयुक्तपणे गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, गवळी शिवरा, रांजणगाव येथे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत राबवण्यात आली.

यावेळी बोलताना आमदार दानवे यांनी आपलं गाव आणि आपली शिवसेना शाखा हेच आपले कुटुंब आहे असे बोलून दाखविले. या काळात पक्ष, जात, भेद बघण्याची वेळ नाही तर आता खऱ्या अर्थाने सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वेळ आहे. या संकटात जो कामात येईल, त्याला माणूस आयुष्यभर विसरणार नाही. हे अनुभव पावलोपावली मागच्या ६-७ महीन्यापासून अनुभवतोय असे दानवे यांनी बोलून दाखविले होते.

कोणी कुटुंबाला ५-६ जणांच घर समजत असेल पण आपल्यासाठी शिवसेनेचं शाखाप्रमुख, सरपंचसाठी त्याच कुटुंब त्याच गाव असतं, जिल्हा परिषद सदस्यांसाठी त्याच कुटुंब त्याच सर्कल असतं, तालुक्याच्या आमदारासाठी त्याच कुटुंब तालुका तर खासदारसाठी त्याच कुटुंब पुर्ण जिल्हा असतो त्याच प्रमाणे महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याचं संपूर्ण कुटुंब महाराष्ट्राची जनता आहे.

सदस्य नोंदणी करत असतांना ज्या घरात ५० वर्ष वयोगटातील नागरीक आहे, या घरात जाऊन आधी नोंदणी करावी आणि त्यांच्या कुटुंबियांची पुर्ण माहिती आरोग्य सेविका, आशा सेविका मार्फत भरुन हिचं नोंदणी आपल्याला करायची. त्या कुटुंबातील प्रत्येकाचं आरोग्य तपासणी करावी.

शासन आपल्या परीने मदत करत आहे मात्र आज शिवसेनेच्या वतीने गावा गावात मास्क वाटत, सॅनिटायझर, हात धुण्याची साबण, वाफेचे वेफिरायझर वाटप मोहीम आमदार अंबादास दानवे यांच्या माध्यमातून सुरु आहे. ‌या सोबत कोरोना विषयी लोकांमध्ये पथनाट्य सादरीकरण, भारुड, गोंधळ वाघ्या मुरळी कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्याचे कामही सुरूच आहे.

Leave a comment

0.0/5