Skip to content Skip to footer

इतर नेते प्रचारात व्यस्त असताना उद्धव ठाकरे दुष्काळ दौरे करत होते विरोधक मात्र हे विसरले…

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्या नंतर सर्वच राजकीय पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱयांचे अश्रू पुसण्याचे खोटे नाटक करतांना दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा मुंबईत मतदान करून दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला होता. परंतु काँग्रेस राजवटीत कृषी मंत्री पद भूषविलेल्या जाणत्या राजाने म्हणजे पवारांनी शेतकर्त्यांनसाठी आणि दुष्काळावर मात करण्यासाठी कोणत्या उपाय-योजना महाराष्ट्रात आणल्या आहेत. आज आपल्या राज्याकडे कृषिमंत्री पद असताना पवारांनी किती कोटीचे कर्ज महाराष्ट्राचे माफ केले आहे. हे आता जनतेला सांगावे.

निवडणुकीच्या आधी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण दुष्काळग्रस्त भाग पिंजून काढला होता. खरं पहिले तर यावेळी दुष्काळ ऑक्टोबर-नोव्हेंबर पासूनच चालू झाला होता. तेव्हा पासूनच शिवसेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी चारा छावणी, पाण्याचे टँकर या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत केली होती. तसेच शिवसेना आणि भाजपा युती होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांन कडून शेतकऱयांची सरसकट कर्ज माफी सुद्धा शिवसेनेने करून घेतली होती. हे साऱ्या महाराष्ट्राच्या समोर मुख्यमंत्र्यानी कबुल सुद्धा केले होते.

परंतु सध्या शिवसेना पक्ष दुष्काळग्रस्त शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत आहे अशी ओरड विरोधकांनी देणे चालू केले आहे. परंतु आज विविध माध्यमातून शेतकऱयांचे अश्रू पुसण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते फक्त शिवसेना पक्षाने केले आहे. आज इतर पक्ष निवडणुकी पुरतेच फक्त शेतकर्यां बद्दल सहानुभूती दाखवत आहे. परंतु मागील अनेक महिन्या पासून शिवसेना आणि शिवसेनेचे नेते दुष्काळग्रस्त भागातील जिल्ह्याचा दौरा करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम करत आहे आणि हेच काम सध्या विरोधाच्या डोळ्यात खुपसत आहे.

Leave a comment

0.0/5