Skip to content Skip to footer

विद्यासागर यांच्या पुतळ्यावर हल्ला करणारे माथेफिरूच – शिवसेना

महाराष्ट्रात जे स्थान महात्मा फुले यांना आहे तेच स्थान पश्चिम बंगालात ईश्वरचंद्र विद्यासागर यांना असून विद्यासागर यांच्या पुतळ्यावर हल्ला करणारे माथेफिरू आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे. पुतळ्याची तोडफोड करणाऱ्यांना स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांचा अर्थ समजलेला नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे. समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची कोलकात्यातील हिंसाचारावेळी मोडतोड करण्यात आली. यावरुन भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून या घडामोडींवर शिवसेनेने आपल्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले.

ईश्वरचंद्र हे साहित्य, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातले शिखरपुरुष होते. महाराष्ट्रा प्रमाणेच पश्चिम बंगाल प्रांतालाही क्रांतिकारक व समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे, याकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे. ईश्वरचंद्र यांनीही दुःखी, कष्टी, पीडित, उपेक्षित यांच्यासाठी आपले आयुष्य वेचले असून त्यांच्या नावाने विद्यापीठे उभी राहिली. त्याच विद्यापीठाच्या आवारातला या महापुरुषाचा पुतळा तोडण्यात आला आता. नवा पुतळा उभारला जाईल, पण विद्यासागर यांच्या पुतळ्यावर हल्ला करणारे माथेफिरू आहेत. त्यांना स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांचा अर्थ समजलेला नाही, असे शिवसेनेने सामना या आपल्या अग्रलेखातून म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5