Skip to content Skip to footer

काँग्रेस पक्षाने पंतप्रधान पदाचा हट्ट सोडला……

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यानं मध्ये पंतप्रधान पदाचा दावेदार कोण यासाठी चर्चा चालू आहे. अशातच काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. काँग्रेसला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, पण भाजपा पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे, असे आझाद यांनी बोलून दाखविले आहे. काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या तर पंतप्रधानपदाचा विचार करेन, असं याआधी राहुल गांधींनी म्हटले होते. पण आता गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसनं पंतप्रधानपदाचा हट्ट सोडला की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान होत आहे. तर निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुतम मिळणार नाही असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी २३ मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे २३ तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर तातडीने निर्णय घेण्याची काँग्रेसची योजना असल्याचे दिसून येते.

 

Leave a comment

0.0/5