नरेंद्र मोदी हे दलितविरोधी नसून दलितांना पाठिंबा देणारे नेते आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, संविधानाचे आदर करणारे मोदी आहेत.नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनविण्यासाठी प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. जो पत्नीला सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही अशी कौटुंबिक पातळीवर जाऊन मायावती यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर केलेली टीका निषेधार्ह असून अशी वैक्तिक टीका आरोप मायावतींनी करू नयेत असे आवाहन रामदास आठवलेंनी केले. मायावतींना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळेच या मोदींवर वैक्तिक टीका करीत असल्याचा आरोप रामदास आठवलेंनी केला.
रामदास आठवले हे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी वाराणसी दौऱ्यावर सहकुटुंब आले आहेत. वाराणसी ही रामदास आठवले यांची सासुरवाडी आहे. १६ मे रोजी रामदास आठवले यांच्या लग्नाचा २७ वा वाढदिवस आहे. रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले आणि पुत्र जित आठवलेंसह सर्व आठवले परिवार आज वाराणसी दौऱ्यावर आले आहेत. रामदास आठवले आणि सौ सीमाताई आठवले या दाम्पत्याने आपला लग्नाचा २७ वा वाढदिवस साजरा करण्याचे टाळून सर्व आठवले परिवाराने नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधामनमंत्री करण्यासाठी त्यांचा प्रचार केला.
येत्या २३ मे ला जो निकाल लागेल त्यात दूध का दुध आणि पाणी का पाणी स्पष्ट होईल.विरोधकांनी कितीही आरोप केले तरी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात पुन्हा भाजपाचे सरकार निवडून येईल असा विश्वास ना रामदास आठवलेंनी व्यक्त केला. देशभरातील दलित भाजपाच्या बाजूने उभा करण्याचा प्रयत्न मी केला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानातील भारत साकारण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला रिपब्लिकन पक्ष भाजपा सोबत आहे. असे सुद्धा मंत्री रामदास आठवले यांनी बोलून दाखविले.