लोकसभा निवडणुकीच्या मत मोजणीला अवघे काही तास उरलेले असताना स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे. आता लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाला निवडणुकांच्या निकालाचे वेध लागलेले आहेत. तसेच निकालांनंतर पंतप्रधानपदी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा संपूर्ण देशभरात सुरु आहे.
माध्यमांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपा केंद्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल अशी शक्यता आहे. याविषयी बोलताना महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी एक मोठ विधान केले आहे.
या विषयी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना विचारण्यात आले तेव्हा एका वृत्तवाहिनीशी बोलताना नारायण राणे यांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपला सत्ता स्थापनेसाठी मदत करू शकतात असे विधान केले आहे. तसेच एक्झिट पोलवर भाष्य करताना त्यांनी ‘एक्झिट पोलवर आपला विश्वास नाही’ असेही नारायण राणे म्हणाले होते. काही दिवसापूर्वी राणे यांचे चिरंजीव निलेश राणे आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे लग्न सभारंभाला एकाच गाडीत दिसले होते.