राष्ट्रवादी पक्षाचे मत्तबल नेते तसेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी दिलेली आहे. क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटून आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलेले आहे. येन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यावर शिरसागर यांनी राष्ट्रवादीला राम-राम ठोकून, आता पहिल्या सारखा राष्ट्रवादी पक्षात राष्ट्रवाद राहिलेला नाही आहे असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले आहे.
जयदत्त क्षीरसागर हे गेले अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. या अस्वस्थतेबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना क्षीरसागर म्हणाले की ‘वादळात ज्या दिव्याचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आमचे हात त्या दिव्याभोवती धरले त्याच दिव्यामुळे हात पोळायला लागले तर काय करायचे? लोकसभा निवडणुकीचे २३ मे रोजी म्हणजे उद्या निकाल लागणार आहेत. एक्झिट पोलमुळे विरोधकांच्या गोटामध्ये चिंता पसरलेली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसला क्षीरसागर यांनी हादरा दिला आहे. या हादऱ्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला दीर्घकाळासाठी सहन करावे लागतील असे बीड जिल्ह्यामध्ये बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांची संपूर्ण ताकद महायुतीसाठी पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या होत्या. केजमध्ये भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्यासाठी त्यांनी १५ एप्रिल रोजी सभा घेतली होती. या सभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. मी राष्ट्रवादीला बाजूला सारले आणि राष्ट्रवादाला जवळ केले. जेथे जातो तेथे प्रामाणिकपणे काम करत असतो.