Skip to content Skip to footer

एक्झिट पोलचे आकडेही कमी पडतील भाजपाच्या विजयावर उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास.

एक्झिट पोलमध्ये दाखविलेल्या आकडेवारीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. एक्झिट पोलमध्ये जे आकडे प्रसिद्धीमाध्यमांनी दाखवलेत, ते आकडेही उद्याच्या निकालात कमी पडतील, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या विजयाबद्दल ठाम विश्वास व्यक्त केला. येणाऱ्या काही तासातच लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे. त्यातच संपूर्ण देशात पुन्हा भारी बहुमताने भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाचे सरकार स्थापन होईल असा विश्वास सुद्धा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

एक्झिट पोलबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांनी एक्झिट पोल कुणाच्या बाजूने लागलेत ते सांगा, असा प्रतिप्रश्न केला. यावर ‘एनडीए’ असे उत्तर येताच ते म्हणाले, तुम्ही जे आकडे एक्झिट पोलमध्ये सांगितलेत ते आकडेही येणाऱ्या निकालात कमी पडतील. ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केल्या जात असल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता उद्धव ठाकरे यांनी तुम्ही जे एक्झिट पोल जाहीर केले आहेत ते ईव्हीएमच्या मतमोजणीवर घेतलेले नाहीत ना, असा सवाल केला.

Leave a comment

0.0/5