नाशिकमध्ये हेमंत गोडसें यांची विजयाकडे कूच…….

लोकसभा | Hemant Godse's victory in Nashik

लोकसभा निकाल २०१९ आज जाहीर होत आहेत. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं भाजपा सरकार सत्तेत येणार की काँग्रेस सरकार सत्तापालट करणार की तिसरी आघाडी आपला दम दाखवणार हे आज समजणार आहे. देशभरात ७ टप्प्यात लोकसभेच्या ५४२ जागांसाठी मतदान झाले आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी चार टप्प्यात मतदान झाले. या मतदानानंतर आता कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होत आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे.राज्यात १२,१९,२३ आणि २९ एप्रिल अशा चार टप्प्यामध्ये लोकसभेसाठी मतदान पार पडले होते. यामध्ये नितीन गडकरी, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा यांच्यासह अनेक उमेदवारांचे भवितव्य मत यंत्रात बंद झाले होते. दरम्यान,नाशिक लोकसभा मतदार संघातून मागे पडलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे पुन्हा आघाडीवर, सुमारे साडे ८ हजार मतांची आघाडीवर आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here