Skip to content Skip to footer

जयदत्त क्षीरसागर यांना मनात असलेली जबाबदारी देऊ -उद्धव ठाकरे

लोकसभा निकालाच्या एक दिवसाआधी राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेना भवन येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मी कोणत्याही पदासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला नसून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी जबाबदारी माझ्यावर सोपवतील ती पूर्ण करणार असे सुद्धा क्षीरसागर यांनी बोलून दाखविले होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जयदत्त क्षीरसागर आज सहकुटुंब, सहपरिवार शिवसेनेत आले आहेत. शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत. शिवसेनेसाठी बीड जिल्हा दूर्लक्षित राहिला होता. आता मराठवाड्यासाठीची मोठी जबाबदारी आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या मनात असलेली जबाबदारी त्यांना मिळेल.” असे बोलून दाखविले.

एक्झिट पोलचा निकाल लागल्यानंतरच क्षीरसागर यांनी प्रवेश केल्याच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, जयदत्त क्षीरसागर यांचा आणि एक्झिट पोलचा काहीही संबंध नाही. गेल्यावेळी प्रियांका चतुर्वेदी आल्या, तेव्हा निवडणूका देखील व्हायच्या होत्या. दुसरीकडे क्षीरसागर यांनी शिवसेनेबद्दल आकर्षण होते म्हणूनच आपण शिवसेनेत प्रवेश घ्यायचा निर्णय घेतल्याचे सांगितले. एक्झिट पोल भाजपाच्या बाजुने आले आहेत. मग एक्झिट पोलही ईव्हिएमवरुनच काढले का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी माध्यमांनाच विचारला. ते विरोधी पक्षांच्या ईव्हिएमवरील आक्षेपाच्या मुद्द्यावर बोलत होते. तसेच एक्झिट पोलचे आकडे बदलू शकतील या विरोधकांच्या मताशी सहमत असल्याचे म्हणत त्यांनी माध्यमांना तुम्ही सांगत आहात ते आकडे कमी पडतील, असे बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5