लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपा पुन्हा दुसऱ्यांदा देशात सत्ता स्थापन करणार आहे. आज २०१४ च्या निवडणुकी पेक्षा भरगोस आणि घवघवीत यश भाजपाला मिळालेले आहे. २०१४ च्या निवडणुका नंतर सर्व विरोधी पक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकटवले होते. परंतु या महाआघाडीचा काहीही परिणाम झालेला दिसून येत नाही आहे. काही महिन्यापूर्वीच सोनिया गांधी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राहुल गांधी यांना अध्यक्ष बनविले होते. त्या पाठोपाठ पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसला यश सुद्धा मिळाले होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीला हवातेवढा उस्साह काँग्रेस पक्षात दिसून आलेला नव्हता. आज भाजपा विरोधात एकत्र आलेल्या सर्वच पक्षाला या निवडणुकीत हार पत्करावी लागलेली आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मनावे लागले. या पराभवा नंतर काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीला देशातील पराभवाला राहुल गांधी हेच जबाबदार आहे अशी कुजबुज काँग्रेस नेत्यानं मध्ये चालू झाली होती. यापैकी कोणत्याही नेत्याने काँग्रेसच्या संस्कृती प्रमाणे याविषयी जाहीरपणे बोलण्यास नकार दिला.
याशिवाय, राहुल गांधी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राईकसंदर्भात घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची होती. राहुल यांनी अधिक संवेदनशीलपणे हा मुद्दा हाताळायला हवा होता. या सगळ्यात सॅम पित्रोदा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची भर पडली. याचाच फायदा भाजपने उचलला. परिणामी लोकांमध्ये काँग्रेसविरोधी भावना तयार झाली. लोकांनी भाजपच्या उमेदवारांकडे पाहून नव्हे तर नरेंद्र मोदी यांना मत दिले, असे या नेत्यांनी सांगितले.