Skip to content Skip to footer

“लाव रे विडिओ”च्या बॅनर वरून आमदार प्रसाद लाड यांना धमकी…..

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वात जास्त मताधिक्यांनी देशात आणि राज्यात भाजपा पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. तसेच महाराष्ट्रात देखील भाजपा आणि शिवसेनेला भरघोस यश मिळालेले आहे. आज राज ठाकरे यांच्या सभांची जादू महाराष्ट्रात काही चाललेली दिसून आलेली नाही. “लाव रे व्हिडिओच्या” माध्यमातून भाजपाला अडचणीत आणण्याचा डाव राज ठाकरे यांचा फसलेला दिसून आलेला आहे. भाजपाच्या विजया नंतर संपूर्ण राज्यात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.

त्यातच भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या कार्यकलया बाहेर लावलेल्या बँनरमुळे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. सायन परिसरात आज लाव रे फटाको, वाजव रे ढोल असे बोर्ड लावण्यात आले. त्यानंतर मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि राडा झाला. या घटनेनंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमक्यांचे फोन येत आहेत. राज ठाकरेंनी आपल्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने व्हिडिओ पुरावे म्हणून सादर केले होते. त्या भाषणांची प्रचंड चर्चा सुद्धा झाली होती.

त्यानंतर भाजपचे नेते आशीष शेलार यांनी खास सभा घेऊन राज यांच्या आरोपांना त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तरही दिले होते. मित्रा तु चुकलास असंही राज यांना म्हणाले होते. राज यांनी आपल्या भाषणांमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन नेत्यांवर घणाघाती टीका केली होती. या दोन नेत्यांपासून देशाला मुक्त करा असे आवाहनही त्यांनी लोकांना केले होते. भाजपला मतं देऊ नका असंही ते म्हणाले होते.

राज ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा पोहोचविण्यासाठी ही सगळी धडपड केली अशी टीक होऊ लागली. पण निकाल लागल्यानंतर मनसे फॅक्टरचा काहीही परिणाम झाला नाही हे स्पष्ट झाल्याने टीकेची परतफेड करण्यासाठी भाजपकडून हे लाव रे फटाके, वाजव रे ढोल हे होर्डींग्ज् लागवल्याचं बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5