Skip to content Skip to footer

“जय श्री राम”ची घोषणा देणाऱ्यांची चामडी सोलून काढू – ममता बॅनर्जी

     लोकसभा निवडणुकीला झालेला भाजपा पक्षाचा विजय हा पश्चिम बंगालच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या चांगलाच जिव्हाळी लागलेला दिऊन येत आहे. अंतिम टप्यात निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान खासदार अमित शहा यांच्या प्रचारा मध्ये बंगाल शहरात हिंसक वळण लागले होते. त्यातच आता ममता बॅनर्जी यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. ‘जय श्री रामच्या घोषणा देणाऱ्यांची चामडी सोलून काढू’, असे वादग्रस्त वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
             ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी २४ परगाणा जिल्ह्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा ताफा जात असताना एका जमावाने ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या. या घोषणा ऐकून संतापलेल्या ममता यांनी त्यांची गाडी थांबविली व त्या गाडी बाहेर येऊन त्या लोकांना आव्हान दिले.  ‘तुमच्यात हिम्मत असेल तर माझ्या समोर या. तुम्ही बंगालमधील नागरिक वाटत नाहीत, भाजपचे गुंड, बदमाश लोकं आहात तुम्ही. आमच्यामुळे तुम्ही इथे राहत आहात. तुमच्या सारख्या लोकांना मी इथून पळवून लाऊ शकते असे वादग्रस्त विधान केले होते.
          तुमची हिम्मत कशी झाली असे करण्याची. एकेकाची चामडी सोलून काढेन’, असा इशारा त्यांनी दिला. तसेच ‘हे सर्व जण बाहेरचे लोकं आहेत. यातील स्थानिक एकही नाही. या सर्व उपद्रवी लोकांना तत्काळ अटक करा’, असे आदेश तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी दिला. याआधीही मिदनापूर जिल्ह्यातील चंद्रकोना येथे एका प्रचारसभेत जात असताना ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यासमोर काही जणांनी जय श्रीरामचच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांच्यावर संताप व्यक्त करणाऱ्या बॅनर्जी यांचा व्हिडीओ व्हायरल झालेला होता.

Leave a comment

0.0/5