Skip to content Skip to footer

निवृत्त एसीपीची पिस्तुल चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक

– सायन परिसरात राहणाऱ्या निवृत्त एसीपीच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने घुसून हाती लागलेल्या पिस्तुलीच्या धाकावर नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा सायन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. संतोष ऊर्फ जय प्रदीप संभरकर (३१), बाबू जमालुद्दीन खान (३५) आणि गणेश उर्फ मामा वैद्य (४७) अशी अटक आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

मानखुर्द परिसरात राहणारा संतोष संभरकर हा लिफ्ट दुरूस्तीचं काम करतो. हे काम करताना आसपासच्या इमारतीत कुठल्या खोल्या रिकाम्या आहेत, त्याची माहिती तो बाबू खानला द्यायचा. त्यानंतर हे तिघं संबंधित ठिकाणी घरफोडी करायचे. काही दिवसांपूर्वी सायन परिसरात राहणारे किर्तीकुमार करंजे (५१) यांच्या घरी या टोळीने चोरी केली. त्यावेळी चोरट्यांनी तिजोरीतील १ लाख ८५ हजार रुपयांच्या दागिन्यांसह करंजे याच्या दिवंगत वडिलांची पिस्तुल आणि ४२ जिवंत काडतुसंही चोरली. करंजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घरी परतल्यानंतर त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचं निदर्शनास आलं.

Leave a comment

0.0/5