महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच ८ जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या तारखेची अफवा पसरली होती. पण आता शनिवारी ८ जूनला १० वीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागाच्या निकाल दुपारी १ वाजता विविध संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
खालील संकेतस्थळाववर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.राज्यभरातून तब्बल १७ लाख ८१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ४ हजार ८७४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली आहे. १ ते २२ मे दरम्यान दहावीची परीक्षा पार पडली होती.
SSC महाराष्ट्र बोर्डचा निकाल पाहण्यासाठी
http://www.mahresult.nic.in/
www.maharashtraeducation.com