:आंबी येथील वीस वर्षीय युवक फारुक मन्सूर इनामदार याने पबजी गेममध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडलेला फारुक नदीकाठच्या करंजीच्या झाडाला गळफास घेतला.
राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले.
घटनास्थळी हेड काँन्स्टेबल पी. बी. शिरसाठव गणेश फाटक यांनीभेट दिली. मजुरी करणारा फारुक पबजी गेममध्ये अडकला होता. तो आठ आठ तास मोबाईल गेम खेळत होता अशी माहिती त्याच्या घरच्यांनी पोलिसांना दिली. रमजान ईदची नमाज अदा केल्यानंतर तो घराबाहेर पडला होता. अर्धा तासाने झाडाला गळफास घेतल्या स्थितीत आढळला.