यावर्षीचा साखर हंगाम घेतलेल्या सहा साखर कारखान्यांनी मे अखेरपर्यंत एफ.आर. पी.ची संपूर्ण रक्कम चुकती केली आहे. असे असले तरी उर्वरित २५ कारखान्यांकडे तब्बल ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी असल्याचे सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. मागील १५ दिवसात पाच कारखान्यांनी २६९ कोटी ४८ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले आहेत.
यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यापैकी गोकुळ माऊली वगळता अन्य ३० कारखान्याने १५ मे पर्यंत ८३८ कोटी ७ लाख ११ हजार रुपये इतकी थकबाकी होती. ३१ मे पर्यंत यापैकी ५ कारखान्यांनी २६९ कोटी ४७ लाख ३७ हजार रुपये इतकी रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. यामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे,पांडुरंग श्रीपूर, संत दामाजी मंगळवेढा, विठ्ठल कॉर्पोरेशन व इंद्रेश्वर कारखान्याचा समावेश आहे. उर्वरित २५ कारखान्यांकडे ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी आहे. हंगाम संपल्याने कारखाने बंद होऊन तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी शेतकºयांच्या उसाचे पैसे दिले जात नाहीत; मात्र या आठवड्यात बºयाच कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे चुकते करण्याची तयारी केली आहे.जिल्ह्यातील १५ कारखान्यांना सॉप्टलोन मंजूूर झाल्याने एफआरपीची रक्कम देता येणार आहे.