Skip to content Skip to footer

खा. विनायक राऊत यांची शिवसेना गटनेते पदी नियुक्ती…

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार विनायक राऊत यांची लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी निवड झाली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची गटनेतेपदी निवड केली आहे. खासदार विनायक राऊत यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचा १ लाख ७८ हजार ३२२ मतांनी पराभव केला होता. तर २०१४ मध्येही त्यांनी दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता.

१९८५ ते १९९२ या कालावधीत त्यांनी मुबंई महानगरपालिकेत नगरसेवक पदही भूषवले होते. तर १९९९ मध्ये विधानसभा सदस्य तर २०१२ मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून गेले होते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपाला मोठे यश मिळाले असून शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती केल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.

Leave a comment

0.0/5