Skip to content Skip to footer

बीएमसी मुंबईकरांची समस्या एका ट्विटवर सोडवणार

बीएमसी मुंबईकरांची समस्या एका ट्विटवर सोडवणार

मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईत अखेर दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत प्रचंड पाऊस पडतो. अशा वेळी मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करत आपले दैनंदिन व्यवहार पार पाडावे लागतात. समस्या निर्माण झाल्यावर त्या सोडवण्यासाठी आधी पालिकेपर्यंत पोहोचाव्या लागतात. एकूणच समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेत वेळ जातो यंदाच्या पावसाळ्यात मात्र हे चित्र काहीसं वेगळं दिसणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे नालेसफाई आणि पावसाळापूर्व कामे याही वर्षी पूर्ण केलेली आहेत मात्र तरीदेखील काही समस्या असतील तर त्या मुंबईकरांनी “माय बीएमसी” वर ट्विट कराव्यात. या समस्या तीन तासात सोडवल्या जातील अशी माहिती युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच नागरिकांनी अनेक ठिकाणी कचरा नाल्यात, गटारीत अथवा नद्यांमध्ये टाकल्यामुळे पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते आणि दोष मात्र पालिकेला दिला जातो. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची आणि मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई महापालिकेने पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता 25 मि.मी.वरून आता 50 मि.मी. केली आहे. नालेसफाई वर्षभर केली जात आहे. मुंबईकरांना पावसाळा सुकर जाण्यासाठी पालिका कर्मचारी झटत आहेत. आपल्या समस्या मांडण्यासाठी पालिकेची वेबसाईट, व्हॉट्सऍप आणि ट्विटरच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईकरांच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठीच जगभरात वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बेस्टचे भाडे किमान ५ रुपये करण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी.

Leave a comment

0.0/5