Skip to content Skip to footer

मुंबई महापालिका अधिकाऱ्याचे मुंबईकरांना पत्र..

मुंबई महापालिका अधिकाऱ्याचे मुंबईकरांना पत्र..

पावसामुळे मुंबईची तुंबई झाली असं म्हणत सर्वत्र टीका होत आहे. अशातच पालिकेतील एका अभियंत्याच्या नावाने मुंबईकरांना उद्देशून लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या भावना मांडणारं हे पत्र जसंच्या तसं आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत:

मुंबई महानगरपालिकेतील एका अतिशय जबाबदार व निस्वार्थी वरिष्ठ अभियंत्याचे मत व नागरिकांना विनंती.

बेजबाबदार नागरिक भावना

आपण टीव्हीवर बातम्या मध्ये पाहतोय की मीडियाने महापालिकेच्या अपयश मिळाल्याबद्दल बाऊ केला आहे. कबूल आहे की अनेक शहरामध्ये पावसाचे पाणी तुंबू नये म्हणून पूर्व नियोजनाचा अभाव होता यात अनेक महापालिका अपयशी ठरल्यात . पण, एक सुजाण नागरिकाच्या भावनेतून वैयक्तिक स्तरावर तुम्ही नाही का अपयशी ठरलात ?

तुम्ही खाद्य पदार्थांचे वेष्टन्न, प्लास्टिक प्लेट्स आणि चमचे ट्रेनच्या खिडकीतून बाहेर फेकून देता जे नष्ट होत नाही व रेल्वे ट्रॅकच्या ड्रेनेज मध्ये अडकून राहते ज्यामुळे ट्रॅकवर पाणी साठते व ट्रेन बंद होतात.
दोषी कोण ?
महापालिका का तुम्ही ?

तुम्ही तुमचे वापरलेले सॅनिटरी पॅड व प्लास्टिक वस्तू कचरा कुंडीत न टाकता थेट टॉयलेटच्या ड्रेन मधून फ्लश करून देता ज्यामुळे सिवेज पाईपलाईन ब्लॉक होते.
दोषी कोण ?
महापालिका का तुम्ही ?

तुम्ही तुमच्या गाड्या रस्त्यावर अशा ठिकाणी पार्क करता की जिथून पालिकांच्या ट्रकला ड्रेनेज सफाई करता येता येत नाही. दोषी कोण ?
महापालिका का तुम्ही ?

तुम्ही तुमच्या घरातील कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा या मध्ये वर्गीकरण करत नाही व तुम्ही अथवा तुमचा सफाई कामगार तो कचरा एकत्रितरित्या बेजबाबदारपणे रस्त्यावर टाकतो व तो कचरा पावसात विखुरला जातो.

दोषी कोण ?
महापालिका का तुम्ही ?

तुम्ही खरेदीसाठी मार्केटमध्ये जाताना पुनर्वापर करण्यायोग्य कापडी पिशवी नेत नाही जेणेकरून प्लास्टिक मुक्त समाज निर्माण होईल, आणि भाजीवाल्यासोबत आणखी एका कॅरीबॅग साठी वाद घालता.

दोषी कोण ?
मुंबई महापालिका का तुम्ही ?

घरातून बाहेर पडताना पुनर्वापर करण्यायोग्य पाण्याची बाटली सोबत न नेता प्रत्येक वेळी जेव्हा मिनरल वॉटरची बाटली खरेदी करता तेव्हा प्लास्टिक कचरा वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावता.

दोषी कोण ?
मुंबई महापालिका का तुम्ही ?

महापालिका घनकचरा ( आरोग्य ) विभागाचे कामगार सर्व कचरा गोळा करण्याचे काम करतो. तोच नाल्यात ,गटारात उतरतो आणि स्वच्छ करतो.

सार्वजनिक संडास, मलनिःसारण नळीका , मोठे हॉस्पिटल मध्ये आजारी रूग्णांची घाण साफ करणे,पालिकांचे कामगार हे सतत मोठमोठ्या रोगराईचा सामना करून परिसरातील नागरिकांचे आरोग्य संभाळत असतो.

ह्या कामगाराचे आयुष्य फक्त ४०ते ५०वर्षे असते, त्याला घाणीचे काम करताना दारूचा आधार घ्यावा लागतो.त्याशिवाय घाणीत काम करु शकणार नाही.

सर्वच सुशिक्षित नागरिकांना विचारतो की, जर साधं कचर्याची गाडी बाजूंनी गेली तरी नाकाचे केस जळतात. ज्याप्रकारे सीमेवर असलेल्या सैनिक शत्रूचा शिरकाव आपल्या सीमेत येऊ देत नाही आणि नागरिकांचे रक्षण करतो त्याच प्रमाणे पालिकेचे कामगार नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करतो.

घाणीत रोज मरणारा कामगार दिसत नाही…. त्याला मरताना सर्टिफिकेट मिळते “बेवडा मेला ” हेच त्यांचे “परमवीर चक्र”असते. आपणही आत्मपरिक्षण करावे……

उठसुट महापालिकेवर बोटे दाखवू नये , आपणं सुध्दा या सुंदर शहराची काळजी घ्यावी… कारण कचरा निर्माण करून यास जबाबदार आपणच आहोत….
ही नम्र विनंती………

बदलाची सुरुवात होते ती
तुमच्यापासून सुरवात करा

आधी एक जबाबदार नागरिक बना.

आपला,
श्री.संतोष जाधव(उपाध्यक्ष)
म्युनिसिपल मजदूर युनियन,मुंबई

पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची खरी कारणे नक्की वाचा

Leave a comment

0.0/5