Skip to content Skip to footer

शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रात पहिला आमदार देण्याऱ्या मतदारसंघात आदित्य ठाकरे

शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्रातील पहिला आमदार निवडून देणाऱ्या मतदारसंघात शिवसेनेचा जन संपर्क दौरा दाखल झाला. यावेळी ठाकरे घराण्याच्या या चौथ्या पिढीचं स्वागत धरणगावकरांनी मोठ्या जल्लोषात केलं. पूर्वी एरंडोल मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ आज धरणगाव नावाने ओळखला जातो. याच मतदारसंघात शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्रातील पहिला आमदार हरिभाऊ महाजन यांच्या रूपाने निवडून आला होता. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी याचा उल्लेख आपल्या भाषणात करत उत्तर महाराष्ट्र आणि त्यातही ग्रामीण जळगावमधून आपला दौरा सुरु केल्याबद्दल आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.

AUT

3 Comments

 • Anil Radhakisan Ambilwade
  Posted July 19, 2019 at 3:41 pm

  Jay Maharashtra

 • Dipak patil
  Posted July 20, 2019 at 2:09 pm

  Best

 • Sandip More
  Posted July 22, 2019 at 8:48 am

  शिवसेना पक्ष मोठा करण्यात गुलाबराव पाटील यांच खूप मोठ योगदान आहे, पण शिवसेना प्रमुख त्यांचं योग्य ते स्थान देत नाही, म्हणजे त्यांना राज्यमंत्री, आणि ज्यांचं काही नाही त्यांना कॅबिनेट.

Leave a comment

0.0/5