रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात….

उमेदवारी | Rohit Pawar's candidature threatens ...

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पवार कुटुंबीयांची तिसरी पीढी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. यात तिसऱ्या पीढीतील एक म्हणजे पार्थ पवार आणि दुसरे म्हणजे रोहित पवार. पार्थ पवारांनी लोकसभेत आपलं नशीब आजमावलं, मात्र, संपूर्ण ताकद लावूनही त्यांचा दारुण पराभव झाला. दुसरीकडे रोहित पवारांनी लोकसभेला माघार घेतानाच विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले होते. नुकताच त्यांनी पक्षाकडे रितसर अर्ज करुन कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणीही केली. मात्र, त्यांची ही उमेदवारी आता धोक्यात आली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी देखील आघाडीचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागावाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होत असल्याचे दिसत आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचा असून काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिल्याने रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

जामखेडची जागा यापूर्वी काँग्रेसनेच लढवली होती. त्यामुळे आम्ही ही जागा सोडणार नाही. ही जागा यापुढेही काँग्रेसच लढवेल, असं ठाम मत काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केलं. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी देखील राष्ट्रवादी कडून उमेदवारीची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here