Skip to content Skip to footer

जन आशीर्वाद यात्रा:संपूर्ण जळगाव जिल्हा शिवसेनामय

आज शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा जन आशीर्वाद दौरा जळगाव येथून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा शिवसेनामय झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनर, कमानी, भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. दौऱ्यात सहभागी वाहनांवर “जन आशीर्वाद यात्रा” असा उल्लेख आणि आदित्य ठाकरेंचा फोटो असलेले स्टिकर्स लावले गेले आहेत. जळगाव येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरात सकाळी ११ वाजता दर्शन घेऊन या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. तेथून पुढे पाचोरा येथील कृष्णाजी नगर मैदानावर दुपारी १२ वाजता या दौऱ्याची भव्य शुभारंभ सभा होईल.

ठिकठिकाणी विजय संकल्प मेळावे

दुपारी ३:३० वाजता धरणगाव येथील इंदिरा गांधी प्रशाला मैदानावर विजय संकल्प मेळाव्यास आदित्य ठाकरे मार्गदर्शन करतील. चोपडा येथील आझाद चौकात दुपारी ५:३० तर पारोळा येथील कृषी बाजार समिती मैदानावर रात्री ८ वाजता विजय संकल्प मेळावे होतील.

प्रमुख चौकात स्वागत

आदित्य ठाकरेंच्या या यात्रेचं आगमन होताच शहरातील प्रमुख चौक आणि ठिकाणांवर त्यांचं स्वागत होणार आहे. हे स्वागत स्वीकारून आदित्य ठाकरे पुढे मार्गस्थ होतील असं नियोजन आहे.

एकूणच आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यानिमित्त संपूर्ण जळगाव जिल्हा भगवा झाला आहे. शिवसेनेने “पहिले मंदिर, फिर सरकार” असा नारा देत अयोध्या आणि पंढरपुरात दौरे केले होते. त्यावेळी या दोन्ही ठिकाणी जशी वातावरणनिर्मिती करण्यात आली होती तशीच वातावरणनिर्मिती आदित्य ठाकरेंच्या या जन आशीर्वाद यात्रा दौऱ्यानिमित्त करण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5