Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील उदयोन्मुख महानेता-मीडिया रिपोर्ट

शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे कालपासून महाराष्ट्रव्यापी जन आशीर्वाद दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांच्या हा दौऱ्या ४००० किमी एवढा प्रवास महाराष्ट्रभर करेल. काल या दौऱ्याचा जळगाव येथे शुभारंभ झाला. आदित्य ठाकरे यांच्या तब्बल चार सभा जळगाव जिल्ह्यात काल झाल्या. या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंच्या शेवटच्या सभेला तीन तास उशीर झाला मात्र तरीही सभेला उपस्थित असलेली गर्दी जागची हलली नाही. या दौऱ्यावरून अनेक चर्चा रंगवणाऱ्या मिडीयातील जेष्ठ पत्रकारांचा या दौऱ्याबद्दलचा दृष्टिकोन आता शिवसेनेसाठी सकारात्मक आणि आश्वासक बनला असून आदित्य ठाकरे या दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नेते म्हणून उदयास येऊ शकतात असं निरीक्षण आता जेष्ठ पत्रकार मीडिया, आणि जाणकारांनी नोंदवलं आहे.

आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना जेष्ठ पत्रकार म्हणतात की आदित्य ठाकरे यांच्यावर सुरुवातीला घराणेशाहीतून पुढं आलेलं नेतृत्व अशी टीका सर्वांनीच केली होती. मात्र या जन आशीर्वाद दौऱ्याला मिळणार प्रतिसाद पाहता त्यांचं नेतृत्व हे सामान्य जनतेने स्वीकारलं आहे असं सिद्ध होतं. एकेकाळी आदित्य ठाकरेंना दुर्लक्षित करणारे पत्रकार आणि मीडिया आज त्यांची मुलाखत घेण्यासाठी धडपडताना दिसतात हेच बोलकं दृश्य आहे. आदित्य ठाकरे यांना पाहण्यासाठी व त्यांचं भाषण ऐकण्यासाठी एवढ्या लहान वयातच तुफान गर्दी उसळत आहे. एवढी लोकप्रियता ही सहजासहजी मिळत नाही. लोकांना आदित्य ठाकरेंचं काम आवडतं आणि त्यांचं नेतृत्व हवं आहे असं हा मीडिया रिपोर्ट म्हणतो.

मीडिया, ज्येष्ठ पत्रकार तसेच राजकीय विश्लेषकांनी नोंदवलेल्या बाबी खालीलप्रमाणे:

-आदित्य ठाकरेंच्या तोडीस तोड असं युवा नेतृत्व केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात नाही.

– त्यांनी घराणेशाहीचा ठपका पुसत जनतेच्या मनात जागा मिळवली आहे असं त्यांच्या दौऱ्याला मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसतं.

-“आदित्य संवाद” सारख्या कार्यक्रमातून तरुणांना आकर्षित करण्यात आदित्य ठाकरे यशस्वी ठरले आहेत. सर्वाधिक मतदान तरुणाईचं असल्याने शिवसेनेला याचा फायदा होईल.

-शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचं नाव थेट मुख्यमंत्री म्हणून पुढं येतंय. तरुणांची मतं लक्षात घेतल्यास आपला नेता आपल्यासारखाच तरुण तडफदार असावा असं वाटत असतं. त्यामुळे आदित्य ठाकरेंचं नेतृत्व शिवसेनेला पुढे घेऊन जाईल.

-महाराष्ट्र किंवा देशातील इतर पक्षाकडे असं नेतृत्व उभं राहताना दिसत नाही. काँग्रेसमध्ये तर गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरु आहे. अशा परिस्थितीत शिवसेना मात्र आदित्य ठाकरेंना प्रमुख नेता म्हणून जाहीर करताना दिसत आहे. ही गोष्ट शिवसेनेला फायद्याची ठरेल.

-आदित्य ठाकरेंचं वय सध्या २९ वर्षे आहे आणि एवढ्या कमी वयातच त्यांना १० वर्षांचा राजकीय अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर ते राजकारणात आपलं स्थान निर्माण करत आहेत. सध्याची राज्याची आणि देशाची स्थिती आणि आदित्य ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आदित्य ठाकरे प्रमुख भूमिका बजावतील.

-जन आशीर्वाद दौऱ्यातील आपल्या भाषणात आदित्य ठाकरे जनतेला “तुम्ही कोणत्याही जातीचे,धर्माचे,पक्षाचे असाल आणि अडचणमीत असाल तर शिवसेनेला मदत मागा, शिवसेना तुमच्या पाठीशी उभी राहील” असं आवाहन करत आहेत. याचा सामान्य जनतेसोबत विरोधकांवर सुद्धा सकारात्मक परिणाम होईल.

-प्रत्येक पक्ष हा आजवर स्वतःचे मतदार टिकवण्यासाठी प्रयत्न करत आला आहे, मात्र आदित्य ठाकरेंची नवी भूमिका याला अपवाद आहे. त्यांनी थेट विरोधकांची मनं जिंकण्याची भूमिका घेतली आहे. काल त्यांनी आपल्या भाषनात बोलताना थेट शिवसेनेच्या विरोधकांनाच प्रेमाची साद घातली. “शिवसेनेला मतदान तेच करत नाहीत ज्यांनी शिवसेनेचं प्रेम आणि काम अनुभवलं नाही” असं म्हणत त्यांनी “एकदा शिवसेनेला आजमावून पहा तुम्ही आमच्यासोबत हमखास याल हे मी छाती ठोकून सांगतो” असं म्हणत विरोधकांना साद घातली आहे. यावरून त्यांची वैचारिक खोली समजते.

-आदित्य ठाकरे करत असलेली युवती आत्मसंरक्षण,डिजिटल क्लासरूम,खेळाची मैदाने,विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप,दुष्काळग्रस्तांना मदत,प्लास्टिक बंदी अशी कामं ही तमाम महाराष्ट्रातील मतदारांना आणि समाजातील सर्वाना समाविष्ट करून घेणारी आहेत.

-शिक्षण,आरोग्य,रोजगार,पर्यावरण समस्या,प्राणिप्रेम,सामाजिक प्रश्न आणि लोकांच्या मनातलं ओळखून तो निर्णय घेणं हे आदित्य ठाकरेंनी करून दाखवलं आहे. बेस्ट बसचं भाडं हे लॉंग रूटसाठी १०० रुपयांवर होतं.आदित्य यांनी ते २५ रुपये करत मुंबईकरांना आपलंसं केलं आहे.

-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील अनेक समस्या ते हाताळतात व सोडवतात. राज्य सरकारच्या अनेक निर्णयांवर ते आपलं मत मांडत असतात आणि निर्णयात बदल सुचवत असतात. त्यांच्या प्रशासकीय कामांविषयी अभ्यास चांगला आहे.

-विशेष म्हणजे ज्या आदित्य ठाकरेंच्या “मिशन १५१” वरून भाजप नेत्यांनी बालहट्ट म्हणत टीका केली होती त्याच भाजपच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शेजारील खुर्चीवर आदित्य ठाकरे संसदेतील कार्यक्रमात बसलेले सर्वांनीच पाहिले आहेत.याचा अर्थ भाजपसारख्या सध्याच्या सर्वात मोठ्या आणि सत्ताधारी पक्षालाही आदित्य ठाकरेंना दुर्लक्षित करता येत नाही.

या सर्व बाबी पाहता महाराष्ट्राचं आगामी नेतृत्व हे आदित्य ठाकरे यांनीच करावं अशी जनतेची ईच्छा आहे. सध्याचा माहोल पाहता आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रातील उदयोन्मुख महानेता म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. आगामी ३० वर्षांचा कालावधी महाराष्ट्रातील राजकारण आदित्य ठाकरेंच्या भोवती फिरू शकतं.

1 Comment

  • Vinod D.Patil
    Posted July 20, 2019 at 9:39 am

    तरुणांनाची स्फुरती व शिक्षण आणि कामकाज करण्यासाठीची उमेद पाहता एक संधी द्यावी मग ते आदित्य ठाकरे आहे म्हणून काय झालं युवासेनेत व युवकांसाठी काम करत आहे.

Leave a comment

0.0/5