Skip to content Skip to footer

मुंबई आणि नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचा, संजय राऊत यांचे संकेत

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष आगामी काळात राज्यात होणाऱ्या येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीकडे लागले आहे. ज्या प्रमाणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीला शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र युती करून घवघवीत याशी मिळवून भाजपाला पराभवाची धूळ चारली तशीच युती येणाऱ्या महानगर पालिकेला तिन्ही पक्ष युती करून भाजपाला महानगर पालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवणार आहे. यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत आहे. तसेच ईडी, सीबीआय यांनी भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागू नये. केंद्राला हवे तसे या संस्था काम करतात, त्यामुळे ईडी, सीबीआयची प्रतिमा मालिन होत आहे, असे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचा सन्मान राखून निवडणुका लढवू तर मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचे महापौर निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

Leave a comment

0.0/5