Skip to content Skip to footer

मराठवाड्यातील दुष्काळ जाऊन जनता सुखी होउदे-चंद्रकांत खैरेंचे गणरायाला साकडे

मराठवाड्यातील दुष्काळ जाऊन जनता सुखी होउदे-चंद्रकांत खैरेंचे गणरायाला साकडे

शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाला अभिषेक सुद्धा केला. सध्या मुंबई-पुण्यात प्रचंड पाऊस आहे. मराठवाडा मात्र दुष्काळाने होरपळत आहे. जायकवाडी जरी भरलं असलं तरी बाकीच्या नद्या आणि तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे मराठवाड्यात पाऊस पडू देत. मराठवाड्यातील दुष्काळ जाऊन जनता सुखी होउदे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी गणरायाच्या चरणी केली असल्याचं मीडियाशी बोलताना सांगितलं. आमच्या मराठवाड्यात पाऊस नाही. आमच्याकडे पाऊस पडू देत. जनता सुखी होउदे. शेतकऱ्यांची सुद्धा प्रगती होउदे. त्यांना भरघोस उत्पन्न मिळू दे असं साकडं त्यांनी बाप्पाला घातलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दुष्काळ दौरा केला. त्यावेळी शेतकऱ्यांची परिस्थिती भीषण होती. तशी परिस्थिती पुन्हा येऊ देऊ नको. मराठवाड्यात पाऊस पडून जनता सुखी – समृद्धी होउदे. शिवाय शिवरायांनी शिवसेनाप्रमुखांच्या हातात दिलेला भगवा झेंडा आणि शिवसेनाप्रमुखांनी पक्षप्रमुखांच्या हातात दिलेला भगवा झेंडा असाच डौलानं फडकत राहूदेत. येत्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रावर फडको आणि शिवसेनेचं राज्य येवो अशी प्रार्थना त्यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी केली आहे.

शिवसेनेच्या अयोध्यावारीचा प्रभाव:ठिकठिकाणी उभी राहिली राममंदिर प्रतिकृती

Leave a comment

0.0/5