Skip to content Skip to footer

पाकिस्तानच्या विमानांची घुसखोरी, हिंदुस्थानने विमानं पिटाळून लावली

श्रीनगर: पुलवामा हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ले करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र त्यामुळे बिथरलेला पाकिस्तान हिंदुस्थानला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानची काही विमाने राजौरी, नौशेरा भागात शिरल्याची माहिती पीटीआयने दिली आहेत. त्यांनी काही कृती करण्याच्या आत सतर्क हिंदुस्थानी जवानांनी गोळीबार करत त्यांना परत पाठवल्याचे सांगण्यात येते आहे. दरम्यान, लेह-जम्मू-श्रीनगर-पठाणकोट मध्ये अलर्ट देण्यात आले आहे. या भागातून विमानांचे उड्डाण बंद करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या विमानांचा हिंदुस्थानात बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न होता असे बोलले जात आहे. मात्र या वृत्ताला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. पाकिस्तान अशी काही कृती करणार अशी शक्यता असल्याने हिंदुस्थानचे जवान सावधान होतेच. त्यांनी काही क्षणातच त्यांना परत धाडले. पाकिस्तान व्याप्त कश्मीरमध्ये हे विमान पळाल्याची माहिती.

दरम्यान, या हिंदुस्थानच्या हवाई दलाने आपल्या विमानांनी गस्त कायम ठेवली असून सीमा भागांमध्ये लडाऊ विमानं घिरट्या घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण परिस्थितीवर हिंदुस्थानच्या हवाई दलाचं पूर्ण लक्ष असून नियंत्रण ठेवण्यात आलं आहे.

Leave a comment

0.0/5